मुंबईकरांचे हाल! ‘बेस्ट’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, ‘या’ मागण्यांसाठी रस्त्यावर
VIDEO | सलग दोन दिवस बेस्ट बस कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मुंबईकरांचे हाल, नेमक्या कोणत्या मागण्यांसाठी 'बेस्ट'च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलं कामबंद आंदोलन
मुंबई, 4 ऑगस्ट 2023 | बेस्ट उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढीसाठी विविध मागण्यांसाठी आज सलग तिसऱ्या दिवशी कामबंद आंदोलन सुरू आहे. विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या संपामुळे बस सेवा बंद असल्याने मुंबईतील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहे. आजच्या तिसऱ्या दिवशी आझाद मैदानावर बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचारी आंदोलन करणार आहेत. तर बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करा, बेस्ट प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी बेस्टचे सर्व बंद बसमार्ग पुन्हा सुरू करा, बस गाड्यांची देखभाल-दुरूस्ती करून बस मार्गस्थ करा आणि विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार वाढवा, अशा विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.