नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...

नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण…

| Updated on: Apr 19, 2024 | 11:00 AM

नाची, बबली आणि डान्सर असा उल्लेख करताना राऊतांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली. तर हा महिलांना अपमान असून राऊतच सध्या काँग्रेसच्या दरबारात नाचत असल्याचा पलटवार रवी राणांनी केलाय. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी संजय राऊत अमरावतीत होते, यावेळी प्रचारसभेतून केली टीका

अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणांवर टीका करताना संजय राऊत भाषेची मर्यादा विसरलेत. नाची, बबली आणि डान्सर असा उल्लेख करताना राऊतांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली. तर हा महिलांना अपमान असून राऊतच सध्या काँग्रेसच्या दरबारात नाचत असल्याचा पलटवार रवी राणांनी केलाय. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी संजय राऊत अमरावतीत आले. यावेळी सभेतून बोलतना संजय राऊत यांनी टिकेची पातळीच ओलांडली. बाई खुणावेल, डोळा मारेल की जायचं नाही, मोहाला बळी पडू नका, असं संजय राऊत म्हणाले. काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांना निवडून द्या, असं आवाहन करताना नवनीत राणांचा उल्लेख राऊतांनी नाची, बबली आणि डान्सर केला. ‘बळवंत वानखेडे विरोधात नाची, डान्सर, बबलीशी नाही तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी आहे. ही लढाई मोदी विरूद्ध उद्धव ठाकरे, ही लढाई मोदी विरूद्ध शरद पवार, ही लढाई मोदी विरूद्ध राहुल गांधी आहे.’ असे वक्तव्य करत राऊतांनी राणांवर हल्लाबोल केलाय. तर दोन दिवसांपासून संजय राऊत अमरावतीत आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेमुळेच राम मंदिर झाल्याचे उल्लेख त्यांनी केला. बघा नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

Published on: Apr 19, 2024 11:00 AM