रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य अन् 7 शहरांत गुन्हे दाखल, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य अन् 7 शहरांत गुन्हे दाखल, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Aug 18, 2024 | 11:27 AM

वादग्रस्त विधानवरून रामगिरी महाराजांवर सात ते आठ शहरात गुन्हे दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे रामगिरी महाराजांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून विरोधकांनी दंगली घडवण्याचा आरोप केला आहे. जाणून घ्या कलम २९९ आणि कलम ३०२ म्हणजे नेमकं काय असतं? बघा व्हिडीओ

मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे रामगिरी महाराज यांच्याविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कलम २९९ आणि कलम ३०२ नुसार, रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. वैजापूर, येवला, अहमदनगर, राहता, संगमनेर, सोलापूर, पुणे या ठिकाणी रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर कलम २९९ म्हणजे हेतू पुरस्सर धार्मिक भावना दुखावणे आणि कलम ३०२ म्हणजे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतून बोलणे. रामगिरी महाराजांना अटक करा, अशी मागणी करत मुस्लिम समाजाचे आंदोलक आक्रमक झालेत. यानंतर रामगिरी महाराज यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. नाशिकच्या सिन्नर येथे हरिनाम सप्ताह सुरू आहे. त्यासाठी मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे यासंदर्भात सरकारवर टीका करताना दंगली घडवण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.

Published on: Aug 18, 2024 11:26 AM