कांद सोडा अन् मासे चालू करा! काय ते मंत्री, काय ते सल्ले? कोणत्या राजकीय नेत्यानं काय म्हटलं?
VIDEO | मासे आणि कांद्यावरुन राजकारण पेटलं, कोणत्या राजकीय नेत्यानं काय दिला अजब सल्ला, 'मंत्री दादा भुसे म्हणतायत की दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडतं आणि दुसरे मंत्री विजयकुमार गावित म्हणतायत की मासे खाल्ल्यांवर कुणीही पटू शकतं'
मुंबई, २१ ऑगस्ट २०२३ | हल्ली आपले नेते कधी-काय बोलतील, कधी काय सल्ला देतील याचा नेम नाही. मंत्री दादा भुसेंनी दरवाढीवरुन काही काळ कांदे नाही खाल्ले तर काय बिघडेल, असा प्रश्न केलाय. आणि मंत्री गावितांनी मासे खावून सुंदर त्वचा मिळवण्याचा उपाय सुचवलाय. या दोन्ही मंत्र्यांचं आवाहन शिरसावंद्य मानत नेटकऱ्यांनी मधला मार्ग सुचवलाय. नेटकरी म्हणतायत की गावितांनी सुचवलेल्या माश्यांच्या भाजीत भुसेंच्या आवाहनाप्रमाणे कांदा न वापरल्यास दोघांचाही सन्मान राखला जाईल. मंत्री दादा भुसे म्हणतायत की दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडतं आणि दुसरे मंत्री विजयकुमार गावित म्हणतायत की मासे खाल्ल्यांवर कुणीही पटू शकतं. म्हणजे एक मंत्री कांदे न खाताही राहता येईल., असं म्हणतायत आणि दुसरे मंत्री मासे खाल्ल्यानं चेहरा चिकना होऊन कुणीही पटवून घेईल असा सल्ला देतायत. योगायोगानं दादा भुसे याआधी महाराष्ट्राचे कृषीमंत्री राहिले आहेत आणि माश्यांमुळे चेहरा चिकना होऊन कुणीही पटवून घेणार डोळे चांगले राहणार, असं म्हणणारे विजयकुमार गावित वैद्यकीय शिक्षणमंत्री राहिले आहेत. आता हे दोन्ही नेते सत्ताधारी आहेत., दादा भुसे शिंदे गटाचे तर विजयकुमार गावित भाजपचे मंत्री आहेत. त्यामुळे गावितांच्या विधानावर उमटलेल्या प्रतिक्रियाही रंजक आहेत बघा व्हिडीओ