देशमुखांकडून फडणवीसांचा ‘फोटो पुरावा’, समित कदमांसोबतचे फोटो सार्वजनिक, कोण आहे हा व्यक्ती?
उद्धव ठाकरेंना अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे प्रस्ताव पाठवला होता, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. हा प्रस्ताव घेऊन येणाऱ्या समित कदम यांचं नाव देशमुखांनी घेतलं इतकंच नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असणारे समित कदम यांचे फोटोच देशमुख यांनी सादर केले आहेत.
अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या वादात आता पुरावे सादर कऱण्यास सुरूवात झाली आहे. उद्धव ठाकरेंना अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे प्रस्ताव पाठवला होता, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. हा प्रस्ताव घेऊन येणाऱ्या समित कदम यांचं नाव देशमुखांनी घेतलं इतकंच नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असणारे समित कदम यांचे फोटोच देशमुख यांनी सादर केले आहेत. सध्या महाराष्ट्राचं राजकारण समित कदम यांच नावावरून तापलं आहे. ठाकरे पिता-पुत्र आणि अजित पवारांना अडकवण्यासाठी फडणवीसांमार्फत जो माणूस आपल्याकडे आला होता, तो समित कदम आहे. सह्यांसाठी खोटे प्रतिज्ञापत्र घेऊन हा व्यक्ती आपल्याकडे आल्याचे देशमुख म्हणाले. तीन वर्षांपूर्वी मविआ सरकारमध्ये अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. त्यामुळे गृहमंत्र्याला समित कदम यांची कोणती गरज भासली की त्यांनी या व्यक्तीला बोलावून घेतलं? बघा यासंदर्भातील स्पसेल रिपोर्ट