मोठ्या पक्षांच्या वादांमुळे यंदा मित्रपक्षांचा भाव कमी? नेमका कुणी कुणाला खो दिला?

मोठ्या पक्षांच्या वादांमुळे यंदा मित्रपक्षांचा भाव कमी? नेमका कुणी कुणाला खो दिला?

| Updated on: Apr 04, 2024 | 11:04 AM

मविआने राजू शेट्टींना पाठिंबा दर्शवला यानंतर तुम्ही पाठिंबा द्या, पण मी मविआमध्ये नाही, अशी भूमिका शेट्टींनी घेतली. मात्र यानंतर शेट्टींना मशाल चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला. शेट्टींनी त्याला नकार दिल्याने ठाकरेंकडून सत्यजित पाटलांना हातकणंगलेची उमेदवारी

जागावाटपामुळे दोन्ही प्रमुख पक्षांमध्येच वाद वाढल्यामुळे यंदा मित्रपक्षांचं दबावतंत्र फारसं कामी न आल्याची चर्चा आहे. शेट्टींना मविआचा पाठिंबा मिळण्याची आशा होती. मात्र ती सुद्धा मावळली. तर दुसरीकडे महायुतीत महादेव जानकरांना परभणीची जागा मिळाली. यंदा तिकीटाच्या शर्यतीत मोठ्या पक्षांमधील स्पर्धेने मित्र पक्षांचे प्रस्ताव मागे पडले. राजू शेट्टी स्वतंत्र लढण्याची चर्चा होती. नंतर त्यांच्या ठाकरेंसोबत भेटी झाल्यात. मविआने राजू शेट्टींना पाठिंबा दर्शवला यानंतर तुम्ही पाठिंबा द्या, पण मी मविआमध्ये नाही, अशी भूमिका शेट्टींनी घेतली. मात्र यानंतर शेट्टींना मशाल चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला. शेट्टींनी त्याला नकार दिल्याने ठाकरेंकडून सत्यजित पाटलांना हातकणंगलेची उमेदवारी मिळाली. दुसरीकडे महायुतीतून याच जागेची मागणी करणारे सदाभाऊ खोतही नंतर नरमल्याचे पाहायला मिळाले. बघा स्पेशल रिपोर्ट, सदाभाऊंनी नेमकी काय घेतली भूमिका?

Published on: Apr 04, 2024 11:04 AM