Cordelia Cruise Corona | कॉर्डिलीया क्रूजमधील 60 प्रवाशांना कोरोना, 2 हजार जणांचे अहवाल आज येणार
कॉर्डिलिया क्रूझ ही ग्रीन गेट येथे मंगळवारी सायंकाळी 6 वाजता दाखल झाली. कॉर्डिलिया बोटीवरील कोरोना बाधित 60 प्रवाशांना रीचर्डसन आणि क्रुडास जम्बो कोविड केंद्रात दाखल करण्यात आलं.
कॉर्डिलिया क्रूझ ही ग्रीन गेट येथे मंगळवारी सायंकाळी 6 वाजता दाखल झाली. कॉर्डिलिया बोटीवरील कोरोना बाधित 60 प्रवाशांना रीचर्डसन आणि क्रुडास जम्बो कोविड केंद्रात दाखल करण्यात आलं किंवा त्यांच्या इच्छेनुसार सुशल्क हॉटेल कोविड केंद्रात देण्यात आलं. क्रूझवरील इतर सर्वांची आरटीपीसीआर चाचणी 2 प्रयोगशाळांमार्फत करण्यात आलीय. याचा अहवाल बुधवारी म्हणजेच आज येण्याची शक्यता आहे. तो अहवाल प्राप्त होताच बाधित (पॉझिटिव्ह) रुग्णांना रीचर्डसन आणि क्रूडास येथील जम्बो कोविड केंद्रात दाखल केले जाईल किंवा त्यांच्या इच्छेनुसार सशुल्क हॉटेल कोविड केंद्रात दाखल होता येईल. ज्यांची चाचणी नकारात्मक आली असेल त्यांना 7 दिवस गृह अलगीकरणात रहावे लागेल. काल रात्री तीन वाजेपर्यंत टेस्ट करण्यात आल्या ,दोन हजार पेक्षा अधिक लोकांच्या टेस्ट झाल्या असून आज रिपोर्ट येण्याची शक्यता आहे.