Corona Case | कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट; दिवसभरात 11 हजार 877 नवे रुग्ण, तर ओमिक्रॉनचे 50 रुग्ण
आज तब्बल 11 हजार 877 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 9 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. 2 हजार 69 कोरोना रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. आज राज्यात ओमिक्रॉनचेही नवे 50 रुग्ण आढळून आल्याने चिंता आणखीच वाढली आहे.
आज राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ गेला आहे. आज तब्बल 11 हजार 877 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 9 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. 2 हजार 69 कोरोना रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. आज राज्यात ओमिक्रॉनचेही नवे 50 रुग्ण आढळून आल्याने चिंता आणखीच वाढली आहे. राज्यातला आकडा तर 12 हजारांच्या जवळ गेल्याने चिंता वाढलीच आहे. मात्र यापेक्षाही जास्त चिंता वाढवली आहे मुंबईतल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने. आज फक्त मुंबईतल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने 8 हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना जास्त धास्ती आहे. राज्यात रोज मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता वाढत आहे. कोरोनाने हैराण केले असतानाच ओमिक्रॉननेही पाय पसरले आहेत, त्यामुळे दुहेरी संकट थोपवण्याचे आव्हान प्रशासनासह सर्वासमोर असणार आहे.
Latest Videos