Special Report | जानेवारीतच कोरोना लाट ओसरणार?

Special Report | जानेवारीतच कोरोना लाट ओसरणार?

| Updated on: Jan 13, 2022 | 9:46 PM

ओमिक्रॉनच्या फैलावानंतर चांगली गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ ब्रिटनमध्येही रुग्णसंख्येला उतरती कळा लागलीय. ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत 59 टक्क्यांची घट नोंदवली गेलीय. ब्रिटनमध्ये 15 डिसेंबरनंतर ओमिक्रॉनचा उद्रेक सुरु झाला होता, तो आता 25 दिवसांनी कमी होत आला आहे.

अवघ्या काही दिवसांत देशात कोरोनाची सक्रीय रुग्णसंख्या 11 लाखांवर गेलीये,  27 डिसेंबर 2021 ला पूर्ण भारतात कोरोनाचे फक्त 81 हजार 906 रुग्ण शिल्लक होते आणि 21 दिवसांतच म्हणजे कालपर्यंत सक्रीय रुग्णांचा आकडा 11 लाख 17 हजारांवर गेला. ओमिक्रॉनच्या फैलावामुळे जगभर रुग्णवाढ सुरु झालीय. मात्र सर्वाधिक मृत्यूचं प्रमाण या घडीला अमेरिकेतच आहे. ओमिक्रॉनच्या फैलावानंतर चांगली गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ ब्रिटनमध्येही रुग्णसंख्येला उतरती कळा लागलीय. ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत 59 टक्क्यांची घट नोंदवली गेलीय. ब्रिटनमध्ये 15 डिसेंबरनंतर ओमिक्रॉनचा उद्रेक सुरु झाला होता, तो आता 25 दिवसांनी कमी होत आलाय, भारतातही 31 डिसेंबरपासून सुरु झालेला उद्रेक एक तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात, किंवा फेब्रुवारीच्या मधात कमी होण्याचा अंदाज आहे.