Rajesh Tope PC | लसीकरणामुळेच तिसऱ्या लाटेची दाहकता कमी होईल : आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. कुठल्याही स्थितीत लसीकरणाला अग्रक्रम द्यावा लागेल. तिसरी लाट येईल तेव्हा येईल, पण त्यापूर्वी आपण महाराष्ट्राला 70 टक्के लसीकरण केलं तर येणाऱ्या लाटेची गंभिरता तेवढी राहणार नाही, असं टोपे यांनी म्हटलंय. टोपे
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झालीय. अशावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. कुठल्याही स्थितीत लसीकरणाला अग्रक्रम द्यावा लागेल. तिसरी लाट येईल तेव्हा येईल, पण त्यापूर्वी आपण महाराष्ट्राला 70 टक्के लसीकरण केलं तर येणाऱ्या लाटेची गंभिरता तेवढी राहणार नाही, असं टोपे यांनी म्हटलंय. टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केलंय.
Published on: Jun 29, 2021 06:28 PM
Latest Videos