लाचखोरीच्या घटनांमध्ये तब्बल 31 टक्के वाढ, पुणे विभागात सर्वाधिक लाचखोरी

लाचखोरीच्या घटनांमध्ये तब्बल 31 टक्के वाढ, पुणे विभागात सर्वाधिक लाचखोरी

| Updated on: Aug 12, 2021 | 10:03 AM

कोरोना महामारिच्या संकटातही राज्यात लाचखोरी सुसाट आहे. यंदाच्या 1 जानेवारी 2021 ते 06/08/2021 पर्यंत राज्यात 648 पेक्षा जास्त लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकलेय. गेल्यावर्षीच्या तुलनेत 31 टक्के लाचखोरी जास्त आहे. कोरोना काळात लाचखोरीत महसूल विभाग अव्वल आहे, तर पोलीस दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कोरोना महामारिच्या संकटातही राज्यात लाचखोरी सुसाट आहे. यंदाच्या 1 जानेवारी 2021 ते 06/08/2021 पर्यंत राज्यात 648 पेक्षा जास्त लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकलेय. गेल्यावर्षीच्या तुलनेत 31 टक्के लाचखोरी जास्त आहे. कोरोना काळात लाचखोरीत महसूल विभाग अव्वल आहे, तर पोलीस दुसऱ्या क्रमांकावर आहे. विभागांचा विचार केल्यास, पुणे विभागात सर्वाधीक 132 लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले असून, औरंगाबाद विभागात 127 लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले असून, औरंगाबाद विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ नाशिक विभागात 111 तर नागपूर विभागात 57 आरोपी एसीबीच्या जाळ्यात अडकलेय. महाराष्ट्र लाचलुचपत विभागाच्या रिपोर्टनुसार, कोरोनाच्या महामारीतही लाचखोर मात्र सुसाट असल्याचं दिसून आले.