देशात 1 लाख 79 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद; गेल्या 24 तासांत 146 रुग्णांचा मृत्यू

देशात 1 लाख 79 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद; गेल्या 24 तासांत 146 रुग्णांचा मृत्यू

| Updated on: Jan 10, 2022 | 11:28 AM

देशात गेल्या 24 तासात 1 लाख 79 हजार 723 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर 146 जणांचा मृत्यू झालाय. ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढली असून 4 हजार 33 वर पोहोचली आहे.

देशात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होतेय. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शनिवारच्या तुलनेत रविवारी 20 हजार रुग्णांची वाढ झालीय. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 79 हजार 723 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर 146 जणांचा मृत्यू झालाय. ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढली असून 4 हजार 33 वर पोहोचली आहे.आयसीएमआरच्या माहितीनुसार रविवारी देशभरात 13.52 लाख नमुन्यांची चाणी करण्यात आली. त्यापैकी 1 लाख 79 हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.