निकालाआधीच विधानसभा अध्यक्षांची मोठी प्रतिक्रिया, 'त्या' विधानाने कोणत्या गटाला टेन्शन?

निकालाआधीच विधानसभा अध्यक्षांची मोठी प्रतिक्रिया, ‘त्या’ विधानाने कोणत्या गटाला टेन्शन?

| Updated on: Jan 09, 2024 | 4:12 PM

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या निकाल जाहीर करणार असून शिंदे की ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे. अशातच आता उद्याचा हा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

मुंबई, ९ जानेवारी २०२४ : शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या निकाल जाहीर करणार असून शिंदे की ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे. अशातच आता उद्याचा हा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे. शिवसेना आमदार अपात्रतेवर उद्या निकाल देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राहुल नार्वेकर म्हणाले. नार्वेकर यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राहुल नार्वेकर म्हणाले, ३४ याचिका सुनावणीसाठी असल्याने वेळ लागणारच होता. त्यामुळे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देण्याचा प्रयत्न करणार तर राष्ट्रवादीबाबतचा निर्णय 30 जानेवारीपर्यत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

Published on: Jan 09, 2024 04:12 PM