Vande Bharat Express : महाराष्ट्रासह देशाला मिळणार 10 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस, कुठं धावणार हायस्पीड ट्रेन?
पुण्यातून दोन नव्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू होणार.... येत्या दोन दिवसात म्हणजेच १२ मार्च रोजी पुण्यासह देशाला १० नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहे. १२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या नव्या १० नव्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
पुणे, १० मार्च २०२४ : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातून दोन नव्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू होणार आहेत. पुणे-बडोदा आणि पुणे-सिकंदराबार अशा दोन नव्या हायस्पीड ट्रेन महाराष्ट्रातून सुरू होणार आहे. येत्या दोन दिवसात म्हणजेच १२ मार्च रोजी पुण्यासह देशाला १० नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहे. १२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या नव्या १० नव्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दरम्यान, मुंबई- गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. त्यानंतर राज्यातील मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबईवरुन शिर्डी, मुंबई-गोवा, मुंबई-जालना, नागपूर ते बिलासपूर या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. आता देशात आणखी दहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहे. त्यातील दोन एक्स्प्रेस महाराष्ट्रातून सुरु होणार असल्याने राज्यातही आनंदाचं वातावरण आहे.