Nitesh Rane यांच्या जामीन अर्जावर उद्या कोर्टाचा निकाल, सरकारी वकिल Pradeep Gharat नेमकं काय म्हणाले
नितेश यांनी अनेकदा पोलीस ठाण्यात येऊन चौकशीला सहकार्य केले आहे. या हल्ल्याचा कट जन आशीर्वाद यात्रेत असे पोलिसीचे म्हणणे आहे मात्र परब यांचा फोटो पाठवला गेला सातपुतेला याचा कोणताही पुरावा नाही, असा युक्तीवाद मानेशिंदे यांनी केला. तसेच संग्राम देसाई यांनी न्यायालयाला नितेश राणे यांच्या दोन दिवसांच्या पोलीस रिमांडची कॉपी सादर केली.
मुंबई : शिवसैनिक संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack Case) प्रकरणात नितेश राणेंच्या (Nitesh Rane) अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. सध्या नितेश राणे न्यायालयीन कोठडीत आहेत. नितेश राणे यांना कोर्टासमोर शरण येत. पुन्हा मुंबई हायकोर्टात (High court) जामीनासाठी अर्ज केला, त्यावर आज सुनावणी पार पडली. नितेश राणेंच्या जामीनावर उद्या निर्णय होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज कोर्टात युक्तीवादा दरम्यान नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कणकवली न्यायालयात जामीन नाकारल्याची तसेच नितेश यांच्या प्रकृतीची माहिती कोर्टाला दिली. नितेश यांनी अनेकदा पोलीस ठाण्यात येऊन चौकशीला सहकार्य केले आहे. या हल्ल्याचा कट जन आशीर्वाद यात्रेत असे पोलिसीचे म्हणणे आहे मात्र परब यांचा फोटो पाठवला गेला सातपुतेला याचा कोणताही पुरावा नाही, असा युक्तीवाद मानेशिंदे यांनी केला. तसेच संग्राम देसाई यांनी न्यायालयाला नितेश राणे यांच्या दोन दिवसांच्या पोलीस रिमांडची कॉपी सादर केली.