पुण्यामध्ये आजपासून जलतरण तलाव, मैदानं खुली

पुण्यामध्ये आजपासून जलतरण तलाव, मैदानं खुली

| Updated on: Jan 24, 2022 | 12:58 PM

पुणे जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, खुली मैदाने, पर्यटनाच्या ठिकाणी असलेले सर्व दुकाने, हॉटेल्स व पर्यटन स्थळे आजपासून खुली करण्यात आलीत.

पुण्यामध्ये कोरोना ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढत असला तरी त्याचा धोका कमी आहे.मागील १५ दिवसांतील आकडेवारीनुसार हे सिद्ध झाले आहे. सरकारी अथवा खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, खुली मैदाने, पर्यटनाच्या ठिकाणी असलेले सर्व दुकाने, हॉटेल्स व पर्यटन स्थळे आजपासून खुली करण्यात आलीत.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रविवारी याबाबतचे आदेश काढले.