नवी दिल्ली : 21 सप्टेंबर 2023 | 2 जुलैला राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाचा अध्यक्ष कोण यावरुनच दोन्ही गटाचे दोन दावे आहेत. सुप्रिया सुळे यांची हकालपट्टी होणार का? या प्रश्नावर अजित पवार किंचित हसतमुखानं प्रतिक्रिया देतात आणि बापाचं वय काढून नाद करु नका म्हणून सुळे अजित पवारांना बजावतात. महाराष्ट्रातला हा वाद थेट संसदेत चर्चेत आला. पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार भाजपसोबत येण्याच्या 7 दिवस आधी भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याची चौकशी होणार का? असा थेट सवाल करत सुळे यांनी अजित पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तर, भावाच्या नात्यावरुनही अजित पवार यांचे नाव न घेता टोलाही लगावला. संसदेत महिला आरक्षणावरील चर्चेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी प्रत्येक घरी बहिणीचं हित जोपासणारा भाऊ नसतो, असं म्हणत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. महत्वाचे म्हणजे अजितदादा यांच्यासोबत भाऊ म्हणून माझी साथ 10 जन्माची असेल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. मात्र, सुळे यांच्या या विश्वासाला फक्त 10 तासातच तडा गेला. पाहा नेमकं काय घडलं?