Video : पुणे, मुंबई द्रुतगती मार्गावर दरडी हटवण्याचे कशा पद्धतीने काम आहे सुरु, पाहा

Video : पुणे, मुंबई द्रुतगती मार्गावर दरडी हटवण्याचे कशा पद्धतीने काम आहे सुरु, पाहा

| Updated on: Jul 27, 2023 | 1:26 PM

Pune News : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळा लगत रविवारी रात्री दरड कोसळलीय होती. त्यानंतर आता कमकुवत झालेल्या दरडी हटवण्याचे कामच हाती घेण्यात आले. त्यासाठी दोन तासांचा ब्लॉक घेतलाय.

पुणे | 27 जुलै 2023 : लोणावळा परिसरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे २३ जुलै रोजी पुणे, मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळली होती. त्यावेळी वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही. या प्रकरानंतर द्रुतगरी मार्गावर ज्या दरडी कमकुवत झाल्या आहेत, त्या हटवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी १२ ते २ दरम्यान या दरडी हटवण्याचे काम पथकाने सुरु केले आहे. त्यासाठी द्रुतगती मार्ग दोन तासांसाठी बंद ठेवला आहे. या काळात ही वाहतूक जुन्या मार्गावरुन वळवली आहे. दरड हटवण्याचा कामाचा पाहा हा व्हिडिओ….

Published on: Jul 27, 2023 01:26 PM