Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अद्भुत…अद्भुत…. कॉमेंट्री ऐकावी की क्रिकेट पहावा? भन्नाट.. ऐकणारेही शब्दामागे धावत सुटतात

मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम आदी भाषांमध्ये कॉमेंट्री केली जाते. इंटरनेटवर संस्कृत भाषेतली ही कॉमेडी तुफान व्हायरल होतेय. मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम आदी भाषांमध्ये कॉमेंट्री केली जाते.

अद्भुत...अद्भुत.... कॉमेंट्री ऐकावी की क्रिकेट पहावा? भन्नाट.. ऐकणारेही शब्दामागे धावत सुटतात
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 10:29 AM

प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम. रंगात आलेली मॅच आणि उत्साहात सुरु असलेली कॉमेंट्री. पण मॅचमध्ये (Cricket Match) काय होतंय यापेक्षा कॉमेंट्री करणाऱ्याकडेच जास्त लक्ष वेधलं जातं…असं कधी झालंय का? एका व्हिडिओत तसंच दिसतंय… कॉमेंट्रीकाराच्या (Coventry) तोंडातून ज्या वेगानं शब्द बाहेर पडतायत… ऐकणाऱ्याचे कान त्याच दिशेने धाव घेतायत.. खरं तर व्हिडिओत (Viral Video) दिसणारं गल्ली क्रिकेट आहे. पण त्याची एवढी अफलातून.. अस्खलित संस्कृत भाषेतील कॉमेंट्री ऐकून सध्या नेटकरी घायाळ झालेत.

एका गल्ली क्रिकेटमधील ही कॉमेंट्री सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतेय. कॉमेंट्री करणारा संस्कृत भाषेत एवढ्या झर्र झर्र बोलतोय की, ऐकणारे हे शब्द ऐकून घायाळ होतायत. नेटकऱ्यांनी तर यावर अद्भुत… अद्भुत… एवढीच प्रतिक्रिया दिलीय.

व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच कॉमेंट्रीकाराने मी बंगळुरू शहरात असल्याचं म्हटलंय. बहुधा संस्कृत बोलणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीच ही मॅच पाहत आहेत…

गॅलरीत उभ्या असलेल्या दोन महिलांशीही व्हिडिओ बनवणाऱ्याने संस्कृतमध्ये संवाद साधला. पण महिलांनी बोलण्यास संकोच दर्शवल्यानंतर त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं…

त्यानंतर अद्भुत असा क्रिकेटचा सामना सुरु असल्याचं कॉमेंट्रीकार म्हणतोय.. बॉलरच्या बॉलवर बॅट्समनने फटकार लगावली… त्यानंतरची कॉमेंट्री ऐकण्यासारखीच आहे….

इंटरनेटवर संस्कृत भाषेतली ही कॉमेडी तुफान व्हायरल होतेय. मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम आदी भाषांमध्ये कॉमेंट्री केली जाते.

पण आगामी काळात संस्कृत भाषेतील कॉमेंट्रीही ऐकायला आली तर नवल वाटणार नाही.

लक्ष्मी नारायण बी एस या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ टाकण्यात आलाय.

VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा
VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा.
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल.
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ.
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?.
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार.
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं.
पुणे अत्याचार प्रकरणात एकनाथ शिंदेंची मोठी माहिती, म्हणाले..
पुणे अत्याचार प्रकरणात एकनाथ शिंदेंची मोठी माहिती, म्हणाले...
स्वारगेट प्रकरणातील आरोपीनं माजी आमदाराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
स्वारगेट प्रकरणातील आरोपीनं माजी आमदाराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मराठी भाषेची दैना थांबेना! एमए-मराठी करणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही
मराठी भाषेची दैना थांबेना! एमए-मराठी करणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही.
स्वारगेटमध्ये बलात्कार, आता 30 हजारांची चोरी, थेट कंडक्टरचे पैसे लंपास
स्वारगेटमध्ये बलात्कार, आता 30 हजारांची चोरी, थेट कंडक्टरचे पैसे लंपास.