प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम. रंगात आलेली मॅच आणि उत्साहात सुरु असलेली कॉमेंट्री. पण मॅचमध्ये (Cricket Match) काय होतंय यापेक्षा कॉमेंट्री करणाऱ्याकडेच जास्त लक्ष वेधलं जातं…असं कधी झालंय का? एका व्हिडिओत तसंच दिसतंय… कॉमेंट्रीकाराच्या (Coventry) तोंडातून ज्या वेगानं शब्द बाहेर पडतायत… ऐकणाऱ्याचे कान त्याच दिशेने धाव घेतायत.. खरं तर व्हिडिओत (Viral Video) दिसणारं गल्ली क्रिकेट आहे. पण त्याची एवढी अफलातून.. अस्खलित संस्कृत भाषेतील कॉमेंट्री ऐकून सध्या नेटकरी घायाळ झालेत.
एका गल्ली क्रिकेटमधील ही कॉमेंट्री सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतेय. कॉमेंट्री करणारा संस्कृत भाषेत एवढ्या झर्र झर्र बोलतोय की, ऐकणारे हे शब्द ऐकून घायाळ होतायत. नेटकऱ्यांनी तर यावर अद्भुत… अद्भुत… एवढीच प्रतिक्रिया दिलीय.
व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच कॉमेंट्रीकाराने मी बंगळुरू शहरात असल्याचं म्हटलंय. बहुधा संस्कृत बोलणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीच ही मॅच पाहत आहेत…
गॅलरीत उभ्या असलेल्या दोन महिलांशीही व्हिडिओ बनवणाऱ्याने संस्कृतमध्ये संवाद साधला. पण महिलांनी बोलण्यास संकोच दर्शवल्यानंतर त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं…
त्यानंतर अद्भुत असा क्रिकेटचा सामना सुरु असल्याचं कॉमेंट्रीकार म्हणतोय.. बॉलरच्या बॉलवर बॅट्समनने फटकार लगावली… त्यानंतरची कॉमेंट्री ऐकण्यासारखीच आहे….
Sanskrit and cricket pic.twitter.com/5fWmk9ZMZy
— lakshmi narayana B.S (@chidsamskritam) October 2, 2022
इंटरनेटवर संस्कृत भाषेतली ही कॉमेडी तुफान व्हायरल होतेय. मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम आदी भाषांमध्ये कॉमेंट्री केली जाते.
पण आगामी काळात संस्कृत भाषेतील कॉमेंट्रीही ऐकायला आली तर नवल वाटणार नाही.
लक्ष्मी नारायण बी एस या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ टाकण्यात आलाय.