अश्लील व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राच्या कस्टडीत वाढ होण्याची शक्यता
अश्लील चित्रपट प्रकरणात राज कुंद्रा आणि रेयान थोरपे या दोघांची पुन्हा कस्टडी गुन्हा शाखेतर्फे मागितली जाणार आहे. कारण दोघांच्या कस्टडीची मुदत आज संपत आहे.
अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणाची मुंबई गुन्हे शाखेतर्फे सध्या चौकशी सुरु आहे. आणखी बऱ्याच जणांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) आणि रेयान थोरपे यांच्याकडून अनेक महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि कागदपत्रंही छापेमारी दरम्यान सापडली आहेत. म्हणून त्याची चौकशी केली जात असून सायबर विशेषज्ज्ञ आणि फॉरेन्सिक एक्स्पर्टची मदतसुद्धा घेतली जात आहे .
राज कुंद्रा आणि रेयान थोरपेची पुन्हा कस्टडी मागणार
अश्लील चित्रपट प्रकरणात राज कुंद्रा आणि रेयान थोरपे या दोघांची पुन्हा कस्टडी गुन्हा शाखेतर्फे मागितली जाणार आहे. कारण दोघांच्या कस्टडीची मुदत आज संपत आहे. गुन्हे शाखेच्या माहितीप्रमाणे अजूनही बऱ्याच तांत्रिक आणि आर्थिक मुद्द्यांवर या दोघांची चौकशी करणे बाकी आहे. त्यामुळे पुन्हा कोर्टात गुन्हे शाखा दोघांच्या पुढील कस्टडीची मागणी करणार आहे .