संघ-भाजपच्या बैठकीत अजितदादांवर खापर, भाजपच्या निशाण्यावर दादा?, शिंदे गटाच्या टार्गेटवर भुजबळ?
छगन भुजबळांमुळे महायुतीमध्ये चलबील सुरू झाल्याचे शिंदे गटाने म्हटलंय. पुण्यात संघ आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा रोष अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर व्यक्त करण्यात आला
अजित पवार आणि छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे दोन नेते संघ, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर आहेत. संघाच्या ऑर्गनायझर मुखपत्रानंतर आता संघाच्या बैठकीत लोकसभेच्या पराभवावरून पुन्हा भाजप आणि अजित पवार यांच्यावर खापर फोडण्यात आलं. तर आता शिंदेंच्या शिवसेनेने छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन भुजबळांमुळे महायुतीमध्ये चलबील सुरू झाल्याचे शिंदे गटाने म्हटलंय. पुण्यात संघ आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा रोष अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर व्यक्त करण्यात आला. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सोबत मात्र कार्यकर्ते नव्हते, असं भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं. दरम्यान, अजित पवारांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आल्याचं कळतंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट