Special Report | राजकीय टीकेचा दर्जा घसरत चाललाय का ? -tv9
सोमय्यांच्या या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. आमची एखादी वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घ्यावी आणि चालवावी. तशी काही वायनरी असेल तर मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे, असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी वाईन उद्योगात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांची एका बड्या उद्योजकाशी पार्टनरशीप आहे, असा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. सोमय्यांच्या या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. आमची एखादी वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घ्यावी आणि चालवावी. तशी काही वायनरी असेल तर मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे, असं संजय राऊत म्हणाले. तसेच कुणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. सोमय्यांचा मुलगा काय चणे- शेंगदाणे विकतो का? भाजप नेत्यांची मुलं काय रस्त्यावर केळी विकतात का?, अमित शहांचा मुलगा ढोकळा विकतो का? असा संतप्त सवालही संजय राऊत यांनी सोमय्यांना केला आहे.
Latest Videos