Sandipan Bhumare | टीका टिप्पणी करणे हे विरोधकांचे कामचं आहे, मंत्री संदिपान भुमरे यांचं वक्तव्य
Sandipan Bhumare | टीका टिप्पणी करणे हे विरोधकांचं कामचं असतं. सत्ताधारी त्यांचं काम चोख बजावतात. त्याने सत्ताधाऱ्यांना काहीच फरक पडत नसल्याचं वक्तव्य रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांनी केले.
Sandipan Bhumare | टीका टिप्पणी करणे हे विरोधकांचं कामचं असतं. सत्ताधारी त्यांचं काम चोख बजावतात. त्याने सत्ताधाऱ्यांना काहीच फरक पडत नसल्याचं वक्तव्य रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी केले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजर राहण्यासाठी सरकारी कर्मचारी, अंगणवाडी ताई, सेविका यांच्यावर दबाव टाकल्या जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर हा सगळा आरोप भुमरे यांनी फेटाळला. सोशल मीडियावर फिरणारे पत्रच बनावट असल्याचे सांगत, या पत्रातील तारीख फेब्रुवारी 2022 मधील असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची उद्या जाहीर सभा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांची उद्या पैठण येथे जाहीर सभा होणार आहे. त्यासभेची सध्या जोरात तयारी सुरु आहे. मंत्री संदिपान भुमरे यांनी सभेसाठी शक्तीपणाला लावली आहे. मागे त्यांच्या एका सभेला कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची गर्दी नसल्याने त्यांच्यावर विरोधकांनी हल्ला चढवला होता.