मंत्रालयात मी कुणाच्या फाईल्स बघितल्या याची भीती वाटतेय का? -Kirit Somaiya
माझ्यावर आधीच आघाडी सरकारमधील नेत्यांनी 13 गुन्हे दाखल केले आहेत. आता आणखी एक गुन्हा दाखल करतील, असं विधानही किरीट सोमय्या यांनी केलं आहे. दिल्लीत टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना सोमय्या यांनी हे विधान केलं. मात्र, सोमय्या यांनी नेमक्या कोणत्या फायली चेक केल्या यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
नवी दिल्ली: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी मुंबईत मंत्रालयात (mantralaya) जाऊन नगरविकास खात्यातील (urban development) काही फाईली चेक केल्या. त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरून किरीट सोमय्यांवर टीका होत असून काँग्रेसने (congress) या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. तर सोमय्या यांनी आघाडी सरकारला भीती कशाची वाटतेय? मी कोणत्या कोणत्या फायली तपासल्या याची भीती वाटतेय का? असा सवाल केला. माझ्यावर आधीच आघाडी सरकारमधील नेत्यांनी 13 गुन्हे दाखल केले आहेत. आता आणखी एक गुन्हा दाखल करतील, असं विधानही किरीट सोमय्या यांनी केलं आहे. दिल्लीत टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना सोमय्या यांनी हे विधान केलं. मात्र, सोमय्या यांनी नेमक्या कोणत्या फायली चेक केल्या यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Latest Videos