Saamana | नारायण राणे भोकं पडलेला फुगा, सामनातून राणेंसह भाजपवर हल्लाबोल

Saamana | नारायण राणे भोकं पडलेला फुगा, सामनातून राणेंसह भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Aug 25, 2021 | 8:38 AM

आज सामनाच्या अग्रलेखातून राऊत यांनी नारायण राणेंना नको नको त्या उपमा देत त्यांच्यावर हल्ला चढवलाय. आजच्या अग्रलेखात त्यांनी राणेंना 5 उपमा दिल्यात. भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत त्यांनी राणेंवर प्रहार केलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आपल्या वक्तव्याची किंमत चुकवावी लागली. काल त्यांना अटक करण्यात आली आणि रात्री उशिरा जामीनही मंजूर करण्यात आला. एव्हाना थोडं काही झालं तरी शिवसेना नेते संजय राऊत मीडियाशी लगेच बोलतात, पण काल सगळ्या घडामोडी घडत असताना त्यांनी मीडियाला एन्टटेंट करणं टाळलं. मात्र आज सामनाच्या अग्रलेखातून राऊत यांनी नारायण राणेंना नको नको त्या उपमा देत त्यांच्यावर हल्ला चढवलाय. आजच्या अग्रलेखात त्यांनी राणेंना 5 उपमा दिल्यात. भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत त्यांनी राणेंवर प्रहार केलाय.