VIDEO : Nawab Malik | कंगनाकडून स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान, तिचा पुरस्कार परत‌ घेतला पाहिजे : नवाब मलिक

VIDEO : Nawab Malik | कंगनाकडून स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान, तिचा पुरस्कार परत‌ घेतला पाहिजे : नवाब मलिक

| Updated on: Nov 12, 2021 | 1:59 PM

अभिनेत्री कंगना रणावतने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानाचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निषेध नोंदवला आहे. लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, ओव्हर डोस ज्यादाही हो गया है, असं सांगतानाच कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

अभिनेत्री कंगना रणावतने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानाचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निषेध नोंदवला आहे. लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, ओव्हर डोस ज्यादाही हो गया है, असं सांगतानाच कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. 1857 पासून या देशात स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू झालं. त्यानंतर लाखो लोकांनी प्राणाची आहुती दिली. गांधींनी मोठा लढा दिला. शेवटी ब्रिटीशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. त्यानंतर एक अभिनेत्री मलाणा क्रिम घेऊन ओव्हर डोस झाल्यावर काही तरी बोलत आहे. त्यामुळे त्यांचा पद्मश्री मागे घेतला जावा.अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.