एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या…, ‘सामना’तून मोदींसह भाजपवर हल्लाबोल
लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासात म्हणजेच चार जून रोजी उद्या लागणार आहे. या निकालापूर्णी एक्झिट पोल देखील समोर आलेत. त्यानुसार देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यावरून विरोधकांनी भाजपवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळत आहे
देशासह राज्यत झालेल्या लोकसभा निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासात म्हणजेच चार जून रोजी उद्या लागणार आहे. या निकालापूर्णी एक्झिट पोल देखील समोर आलेत. त्यानुसार देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यावरून विरोधकांनी भाजपवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरे गट आणि समाना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. ‘4 जूनला मतमोजणी होईल आणि हुकूमशाहीचा अंधकार देखील दूर होणार आहे. तर मोदींनी ध्यान केलं तरी मोदी जनतेच्या मनातील उद्रेक शांत करू शकले नाहीत’, अशी खोचक टीका सामनातून करण्यात आली आहे. ‘मोदीनी ध्यान केले व सूर्याला शांत केले असे भाजपवाले सांगतात. मोदी यांनी ध्यान केले तरी जनतेच्या मनात उसळलेला उद्रेक ते शांत करू शकलेले नाहीत आणि त्यामुळे भाजपचा पराभव होणारच आहे. भाजप 225 जागांच्या पुढे जात नाही आणि इंडिया आघाडी 295 ते 310 जागा जिंकून सरकार स्थापन करेल. एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेडयांसारखा आहे. त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही. मोदी है तो इंडिया आघाडीचा विजय शंभर टक्के मुमकीन है। मोदी जात आहेत हाच 4 जूनचा खरा निकाल आहे.’