'चोरांचे सरदार दिल्लीचे सरकार चालवत आहेत', सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर जोरदार निशाणा

‘चोरांचे सरदार दिल्लीचे सरकार चालवत आहेत’, सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर जोरदार निशाणा

| Updated on: Sep 06, 2023 | 8:46 AM

VIDEO | 'देशाचा व्हिलन साळवे यांच्या लग्नात दिसल्यामुळे भाजपची पुरती नाचक्की अन् लोकांना मूर्ख चैनविण्याचा हा धंदा आहे. समानाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर नेमका काय केला हल्लाबोल?

मुंबई, ६ सप्टेंबर २०२३ | ‘चोरांचे सरदार दिल्लीचे सरकार चालवत आहेत’, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. तर ललित मोदीला कुणाचे संरक्षण हे साळवे यांच्या लग्नाने उघड झाले आहे. इतकंच नाही तर देशाचा व्हिलन लग्नात दिसल्यामुळे भाजपची पुरती नाचक्की झाली असल्याचे खोचक टीकाही सामनातून करण्यात आली आहे. ‘मोदी सरकारला पाकिस्तानातून दाऊदला आणता आलेले नाही आणि ‘भगोडा’ गुन्हेगार तसेच ज्याच्याबाबत ‘लुक आऊट’ नोटीस जारी झाली आहे तो ललित मोदी समोर दिसत आहे, तोही केंद्र सरकारच्या वकिलांबरोबर ‘चिअर्स’ करताना. लोकांना मूर्ख चैनविण्याचा हा धंदा आहे. सगळे चोर एक आहेत व चोरांचे सरदार दिल्लीचे सरकार चालवीत आहेत. ललित मोदीस कुणाचे संरक्षण लाभले आहे, हे साळवेंच्या तिसऱ्या लग्नाने उघड केले. तिसऱ्या लग्नाची ही गोष्ट रंजक आहे. देशाचा व्हिलन त्या लग्नात दिसल्यामुळे भाजपची पुरती नाचक्की झाली, पण निर्लज्जम् सदासुखी! भाजपचा मुखवटा हा असा रोजच गळून पडतो आहे.’, अशा शब्दात सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.

Published on: Sep 06, 2023 08:46 AM