Special Report | कॉंग्रेस नेते होते कुठे, लतादीदींच्या अंत्यसंस्काराला गैरहजर
भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर, त्यांच्या अंत्यसंस्काराला कॉंग्रेसच्या बड्याबड्या नेत्यांची गैरहजेरी असल्याने आता टीकेची झोड उठली आहे.
मुंबईः भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर, त्यांच्या अंत्यसंस्काराला कॉंग्रेसच्या बड्याबड्या नेत्यांची गैरहजेरी असल्याने आता टीकेची झोड उठली आहे. मुंबई प्रदेशध्यक्ष भाई जगताप यांच्याशिवाय कॉंग्रेसचा एका बडा नेता लतादीदींच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थिती नव्हते. लता मंगेशकर आणि कॉंग्रेसच्या गांधी घराण्यातील तिसऱ्या पिढीबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रियंका गांधी, राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या निवडणूकीत व्यस्त होते, तरीही प्रियंका गांधी यांनी त्यांना तिथे आदरांजला वाहिली. मात्र महाराष्ट्रातील एका कॉंग्रेस नेत्यानं शिवाजी पार्कवर हजेरी लावली नाही. जशी नेत्यांनी हजेरी लावली नाही तशाच ज्यांची करियर लतादीदींच्या आवाजाने बहरला आली अशा अभिनेत्रीही यावेळी उपस्थित नव्हत्या. त्यामुळे वहिदा रेहमान, राखी, रेखा, माला सिन्हा, जया बच्चन आणि माधुरा दीक्षितांवर जोरदार टीका होत आहे.