Special Report | 90% आमदार पैसेवाले, तरी सवलतींची खैरात का?-tv9

Special Report | 90% आमदार पैसेवाले, तरी सवलतींची खैरात का?-tv9

| Updated on: Mar 25, 2022 | 10:17 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांसाठी मुंबईत 300 घरं बांधणार असल्याची घोषणा काल विधानसभेत केली. त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही आमदारांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. तर काही आमदारांनी मात्र या घरांना विरोध केला आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांसाठी मुंबईत 300 घरं बांधणार असल्याची घोषणा काल विधानसभेत केली. त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही आमदारांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. तर काही आमदारांनी मात्र या घरांना विरोध केला आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी “मला सरकारी घर नको”, अशी भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय. तसंच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही अशीच भूमिका घेतली आहे. या दोघांच्याची विधानाचं सध्या सर्वसामान्यांकडून स्वागत होतंय.