Special Report | सामनाच्या अग्रलेखातून आज शिंदे गटावर जबरदस्त घणाघात
ज्या राठोडांना मविआ सरकारच्या कार्यकाळात राजीनामा द्यावा लागला..त्यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानं टीका करण्यात आलीय. संजय राठोड हे महामानव त्यांच्या गावात गेले. तिथे ट्रकभर फुलं त्यांच्यावर उधळण्यात आली. त्या प्रत्येक फुलाच्या पाकळीतून पुण्याच्या निर्भयाची किंकाळीच ऐकू येत असावी. पण सरकारच जर बारा भानगडी आणि लफडी करुन आलं असेल तर त्या अबलेच्या किंकाळ्यांना विचारतेय कोण? अशी टीका राठोडांवर करण्यात आलीय.
मुंबई : जे 50 जण शिंदे गटात(Shinde group) गेले, त्यांना मंत्रिपद व काही ना काही हवे म्हणून गेले. हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही. ज्यांना मंत्रिपद वगैरे मिळणार नाही, त्यांना प्रतिशिवसेना भवनातून प्रति-मंत्रिपदे देता येतील काय? प्रति राज्यपाल एखाद्या प्रति राजभवनात या भानगडबाज गटाचा प्रति-शपथविधी करु शकतील काय? राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो सुरु झालाय. त्याची फुकट मजा बघायला काय हरकत आहे? अशी टीका सामनातून(samana newspaper) करण्यात आलीय.
आमदार शिरसाट यांनी उघड नाराजी व्यक्त केलीय. ‘मला कॅबिनेट मंत्रिपद आणि संभाजीनगरचे पालकमंत्रीपद हवे म्हणजे हवेच’. काल परवा आलेल्या टोपीफिरवू केसरकरांना मंत्रिपद मिळते, मग आम्हाला का नाही? असं शिरसाट म्हणतात. शिरसाट या भानगडीत इतके बावचळले की, त्यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवर उद्धव ठाकरे हेच कुटुंबप्रमुख असल्याचं जाहीर केलं आणि नंतर सारवासारव करत हा टेक्निकल लोचा असल्याचं सांगितलं
ज्या राठोडांना मविआ सरकारच्या कार्यकाळात राजीनामा द्यावा लागला..त्यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानं टीका करण्यात आलीय. संजय राठोड हे महामानव त्यांच्या गावात गेले. तिथे ट्रकभर फुलं त्यांच्यावर उधळण्यात आली. त्या प्रत्येक फुलाच्या पाकळीतून पुण्याच्या निर्भयाची किंकाळीच ऐकू येत असावी. पण सरकारच जर बारा भानगडी आणि लफडी करुन आलं असेल तर त्या अबलेच्या किंकाळ्यांना विचारतेय कोण? अशी टीका राठोडांवर करण्यात आलीय. प्रत्येक जिल्ह्यात शिंदे गट वेगळं शिवसेना भवन सुरु करणार आहे. त्यावरही सामनातून टीका करण्यात आलीय.