'मी साधा अन् मोकळा ढाकळा माणूस पण माझ्या वक्तव्याचा ‘ध’ चा ‘मा’ होतोय', चंद्रकांत पाटील स्पष्टच म्हणाले...

‘मी साधा अन् मोकळा ढाकळा माणूस पण माझ्या वक्तव्याचा ‘ध’ चा ‘मा’ होतोय’, चंद्रकांत पाटील स्पष्टच म्हणाले…

| Updated on: Apr 11, 2023 | 4:10 PM

VIDEO | चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या 'त्या' व्यक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोप, पत्रकार परिषद घेत पुन्हा काय दिलं पाटलांनी स्पष्टीकरण

पुणे : भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिद पाडण्याच्या मुद्द्यावरून केलेल्या व्यक्तव्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाबरी मशिदीच्या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या व्यक्तव्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. बाबरी मशीद पाडली त्यावेळेला भाजप पळून गेलं होतं आणि तेव्हा भाजप नेत्यांनी हे काम शिवसेनेने केलं असं सांगत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. यावरच चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेतली आणि म्हणाले, माझ्या वक्तव्याचा ध चा मा केला गेला असं सांगत बाळासाहेब ठाकरे यांचा कधीही माझ्याकडून अवमान होऊ शकत नाही असेही स्पष्टपणे म्हटले. मी केलेला विधानाचा नेहमी दुसरा अर्थ काढला जातो. ध चा मा केला जातो. आणि हे वारंवार होतंय असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यावरून चंद्रकांत पाटील यांना नेमकं कोण टार्गेट करतंय असा सवाल उपस्थित होत आहे.

Published on: Apr 11, 2023 04:07 PM