थेट भर रस्त्यावरच महाकाय मगरीचा ‘कॅटवॉक’, नागरिकांमध्ये एकच खळबळ, बघा थरारक व्हिडीओ
चिपळूणच्या चिंचनाक्याच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिव नदीत मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. चिपळूण मधील चिंचनाका परिसरात अशीच एक महाकाय मगर रस्त्यावर दिसल्याने मोठी खळबळ उडाली.
चिपळूणच्या चिंचनाका परिसरातील एका रस्त्यावर महाकाय मगरीचा मुक्तसंचार पाहायला मिळाला आहे. भल्या मोठ्या मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चिपळूणच्या चिंचनाक्याच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिव नदीत मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. चिपळूण मधील चिंचनाका परिसरात अशीच एक महाकाय मगर रस्त्यावर दिसल्याने मोठी खळबळ उडाली. ही भली मोठी मगर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना दिसली तेव्हा त्यांची चांगलीच बोबडी वळली. यावेळी रस्त्यावर असणाऱ्यांनी महाकाय मगरीचा व्हिडीओ फोनमध्ये शूट केला. त्यानंतर तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. तुम्ही पाहिला का या महाकाय मगरीचा व्हिडीओ..तुम्ही देखील अवाक् व्हाल
Published on: Jul 01, 2024 01:03 PM
Latest Videos