Sambhuraj Desai | खासदार हेमंत गोडसेंच्या कार्यक्रमात गर्दी प्रकरणी चौकशी होणार : गृहराज्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला शिवसेना नेत्यांकडूनच केराची टोपली दाखवली जातीय. नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसेंच्या हस्ते झालेल्या उड्डाणपुलाच्या उदघाटन कार्यक्रमाला स्थानिक नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी तूफान गर्दी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला शिवसेना नेत्यांकडूनच केराची टोपली दाखवली जातीय. नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसेंच्या हस्ते झालेल्या उड्डाणपुलाच्या उदघाटन कार्यक्रमाला स्थानिक नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी तूफान गर्दी केली. यावेळी गोडसेंसह अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हता ..काल वरुण सरदेसाई तर आज हेमंत गोडसेंच्या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले..बर इतकंच काय तर खासदार साहेबांनी या ठिकाणी आपलं फोटो सेशन ही केलं,म्हणजे आता तुम्हीच बघा,गरजेचं काय आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता के के वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेल दरम्यान 2.6 किमी उड्डाणपुल तयार करण्यात आला जवळपास 457 कोटी रुपयांचा हा उड्डाणपूल बनवण्यात आलाय. आज हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. याच कार्यक्रमा दरम्यान नियम पायदळी तुडवले गेले, काल वरुण सरदेसाई यांच्या युवा सेना संवाद मेळाव्या दरम्यान ही सर्व नियमांची पायमल्ली केली गेली. याबाबत शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना विचारले असता,उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांची गर्दी झाली असं अजब उत्तर त्यांनी दिलं. मात्र, जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
Latest Videos