पुण्यात कोरोना नियम धाब्यावर, मंडई चौकात खरेदीसाठी तुफान गर्दी
कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र असे असताना देखील नागरिक सर्रासपणे कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत, पुण्याच्या मंडई भागात आज नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. वाढत्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
पुणे: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आज दिवसभरात 44 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यापाठोपाठ पुण्याचा नंबर लागतो. गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र असे असताना देखील नागरिक सर्रासपणे कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत, पुण्याच्या मंडई भागात आज नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. वाढत्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
Latest Videos