पनवेल: उपमहापौरांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन

पनवेल: उपमहापौरांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन

| Updated on: Dec 30, 2021 | 9:22 AM

पनवेलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.

नवी मुंबई: पनवेलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. विशेष म्हणजे भाजपाचे आमदार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन होत असल्याने हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.