गुढीपाडव्यानिमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी

गुढीपाडव्यानिमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी

| Updated on: Apr 02, 2022 | 11:09 AM

कोरोनाचे निर्बंध उठवल्यानंतर आलेला गुढीपाडवा हा पहिलाच सन असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुढीपाडव्यानिमित्ती पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनसाठी गर्दी केली आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून राज्यावर कोरोनाचे संकट होते. करोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे दोन वर्ष कोणतेच उत्सव साजरे करता आले नाही. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नुकतेच काही दिवसांपूर्वी कोरोनाचे निर्बंध उठवण्यात आले आहेत. कोरोनाचे निर्बंध उठवल्यानंतर आलेला गुढीपाडवा हा पहिलाच सन असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुढीपाडव्यानिमित्ती पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनसाठी गर्दी केली आहे.