शासनाच्या नियमांची सरपंच व ग्रामस्थांकडून पायमल्ली; धबधब्यावर पर्यटकांची अफाट गर्दी; संचारबंदी असतानाही पर्यटकांची लूट?
यामध्ये माणगाव तालुक्यातील भिरा, विळा सणसवडी येथील देवकुंड व सीक्रेट पॉईंट अति सुंदर व नयनरम्य धबधबे आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांची सतत गर्दी पाहाव्यास मिळते.
रायगड,18 जुलै 2023 | कोकणात पावसाळ्यामध्ये डोंगर दऱ्यातून वाहणारे धबधबे प्रयटकांना आकर्षक ठरतात. यामध्ये माणगाव तालुक्यातील भिरा, विळा सणसवडी येथील देवकुंड व सीक्रेट पॉईंट अति सुंदर व नयनरम्य धबधबे आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांची सतत गर्दी पाहाव्यास मिळते. तर याधबधब्यांचे आकर्षण अनेकांच्या जीवावर बेतल्यामुळे अखेर शासनाकडून देवकुंड व सीक्रेट पॉईंट व आजूबाजूच्या एक किलोमीटर परिसरात १४४ कलम लागू केले. मात्र या धबधब्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी पाहाव्यास मिळत आहे. तर शासनाच्या नियमांची बिनधास्तपणे पायमल्ली केली जात असल्याचे समोर येत आहे. देवकुंड धबधब्यावर जाण्यासाठी ग्रामपंचायत प्रत्येकी पर्यटकांकडून स्वच्छतेच्या नावाखाली २० रुपये आकारत आहे. मात्र स्वच्छता शून्य दिसत आहे. तसेच प्रत्येकी पर्यटकांकडून १०० रुपये वसुल केले जात आहेत व पार्किंग २०० रुपये वसुल करण्यात येत आहेत. तर १४४ कलम लागू असून स्थानिक सरपंच व ग्रामस्थ दर रोज हे पैसे वसुल करत आहेत. मात्र यावर कोणतिही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे लाखोच्या कमाईमध्ये शासकीय अधिकाऱ्यांची भागीदारी तर नाही ना असे प्रश्न निर्माण होत आहेत. निर्बंध लागू असलेल्या ठिकाणी दर रोज हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत मात्र प्रांत कार्यालय माणगाव व पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका का बजावत आहेत असे प्रश्न ही निर्माण होत आहेत.

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड

पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती

विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
