सायबर गुन्हेगारीत सेक्सटॉर्शनचं वाढतं टेन्शन, सायबर तज्ज्ञ अजित पारसे म्हणतात…

| Updated on: Nov 23, 2021 | 7:23 PM

सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी इंटरनेट वापरकर्त्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, सोशल मिडिया कसा जपून वापरावा याचा सल्ला सायबरतज्ज्ञ अजित पारसे यांनी दिला.

देशभरात सोशल मिडिया वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतेय. तरुणांसोबतच ज्येष्ठ नागरिकंही मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांचा वापर करतात. आता निवडणुका येत आहेत, त्यामुळे इंटरनेट वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. आजकाल इंटरनेटवर सेक्सटोर्शन वाढत आहे. लोक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, नाव आणि आवाज बदलून पैसे मागतात. सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी इंटरनेट वापरकर्त्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, सोशल मिडिया कसा जपून वापरावा याचा सल्ला सायबरतज्ज्ञ अजित पारसे यांनी दिला.