Cyclone Mocha : बंगालच्या उपसागरात मोका चक्रीवादळ धडकणार, ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा
VIDEO | बंगालच्या उपसागरात मोका चक्रीवादळ धडकणार, 'या' राज्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
मुंबई : चक्रीवादळाच्या (Cyclone Mocha) पार्श्वभूमीवर आज राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल आणि पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबईतही सकाळपासून ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. तर मोका चक्रीवादामुळे पूर्व किनारपट्टीवरील राज्यांना ११ मेपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे मोका चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर IMD ने हा इशारा दिल्याचे पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याने हे मोका चक्रीवादळ विकसित होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर आज मोकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ठीक-ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडतील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे
Published on: May 07, 2023 09:44 AM
Latest Videos