‘Sharad Pawar यांनी राजकारणातून रिटायर व्हावं’, कुणी केलं मोठं वक्तव्य अन् दिला सल्ला?
VIDEO | शरद पवार यांच्याबद्दल सर्वात मोठं वक्तव्य, देशाला कोरोनाची लस देणारे सायरस पुनावाला यांनी दिला शरद पवार यांना थेट राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला, राजकीय वर्तुळात आलं चर्चांना उधाण
पुणे, ३० ऑगस्ट २०२३ | विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक उद्या मुंबईत होणार आहे. शरद पवार हे जोमाने कामाला लागले आहेत. शरद पवार भाजपविरोधात लढण्यासाठी जंगजंग पछाडलेले दिसत असताना शरद पवार यांनी निवृत्त होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सीरम इन्सिट्यूचे अध्यक्ष सीरम इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग डायरेक्टर सायरस पुनावाला यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. सायरस पुनावाला यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. “माझं शरद पवारांना म्हणणं आहे की, त्यांना देशाचा पंतप्रधान होण्याची दोनवेळा संधी होती. पण त्यांनी ती संधी घालवली. कारण ते खूप फार हुशार आहेत. ते देशाची फार सेवा करु शकले असते. पण त्यांची संधी गेली. याबाबत मला जास्त वाटतं. आता त्यांचं वय झालं आहे. त्यांनी आता रिटायर व्हावं”, असं वक्तव्य सायरस पुनावाला यांनी केलंय.