Dada Bhuse | कंगना एक महान व्यक्ती, दादा भुसे यांचा कंगनाला उपरोधिक टोला

Dada Bhuse | कंगना एक महान व्यक्ती, दादा भुसे यांचा कंगनाला उपरोधिक टोला

| Updated on: Nov 17, 2021 | 11:45 PM

अभिनेत्री कंगना रनौतने जे वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्यावरून कृषिमंत्री दादा भुसे यांनी खोचक प्रतिक्रिया दिलीय. त्या एक महान व्यक्ती आहेत असा टोला त्यांनी मारला आहे. "त्या महिला आहेत, आपल्या संस्कृती प्रमाणे त्यांचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. पण त्यांच्या वक्तव्याला किती महत्व द्यायचे हेही महत्वाचे आहे. 

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने जे वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्यावरून कृषिमंत्री दादा भुसे यांनी खोचक प्रतिक्रिया दिलीय. त्या एक महान व्यक्ती आहेत असा टोला त्यांनी मारला आहे. “त्या महिला आहेत, आपल्या संस्कृती प्रमाणे त्यांचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. पण त्यांच्या वक्तव्याला किती महत्व द्यायचे हेही महत्वाचे आहे. हजारो स्वातंत्र्यवीर, हुतात्मे यांच्या बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र मिळाले आहे. याचे भान कोणी ठेवणार नसेल तर याला काय म्हणायचे,” असा उपरोधिक टोला दादा भुसे यांनी लगावला. दादा भुसे वसई विरारमध्ये दौरा करताना बोलत होते.