Video | 'देवा पाऊस येऊ दे' शेतकर्‍यांसाठी कृषिमंत्री दादा भुसे यांचे परमेश्वराला साकडे

Video | ‘देवा पाऊस येऊ दे’ शेतकर्‍यांसाठी कृषिमंत्री दादा भुसे यांचे परमेश्वराला साकडे

| Updated on: Jul 10, 2021 | 5:43 PM

दुर्दैवाने जर पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. असं संकट उभ राहिलंच तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे दादा भुसे म्हणाले.

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे. पाऊस न आल्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे टाकले आहे. याच पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दादा भुसे यांनी परमेश्वराला साकडे घातले आहे. त्यांनी देवा पाऊस येऊ दे असे साकडे घातले आहे. आपण पाऊस येऊ दे अशी देवाला विनंती करुयात. पण दुर्दैवाने जर पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. असं संकट उभ राहिलंच तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे दादा भुसे म्हणाले.