विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या ‘त्या’ दाव्यावर दादा भुसे म्हणाले…
VIDEO | विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या 'त्या' दाव्यावर दादा भुसे यांची मिश्किल टिप्पणी, सर्वसामान्य जनता देखील या महायुतीच्या सरकारवर खुश आहे. जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी असे वक्तव्य नेहमी केले जातात.
नाशिक, १९ ऑगस्ट २०२३ | एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील, हे बावनकुळे सांगत असतील तर त्यावर माझा विश्वास अजिबात नाही. कारण बावनकुळेंना किती माहिती आहे मला माहिती नाही. त्यांचा सोर्स काय आहे हे मला माहिती नाही. खरतर राज्यात मुख्यमंत्री कोण? असा सवाल विचारला जातोय. शिंदेंचा मुलगा मुख्यमंत्री की तीन उपमुख्यमंत्री? जे मुख्यमंत्री झाले त्यांना काम करू दिलं नाही, माझा सोर्स मला सांगतो की राज्याचा मुख्यमंत्री बदलणार आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. यावर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्वप्न पाहण्याचा सर्वांना अधिकार त्यामुळे त्यावर कोणतंही बंधन नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे. यासरकारमध्ये अतिशय प्रभावीपणे निर्णय घेत आहेत. सर्वसामान्य जनता देखील या महायुतीच्या सरकारवर खुश आहे. जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी असे वक्तव्य नेहमी केले जात असल्याचा खोचक टोला दादा भुसे यांनी विजय वडेट्टीवार यांना लगावला.