Breaking | राज्यात डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला
कोरोना विषाणूनंतर आता राज्यात डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, रायगडमध्ये डेंग्युचा फैलाव होतोय. अनलॉक झाल्याने लोकांनी रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि जंकफूड खायला सुरूवात केल्याने याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागलाय.
कोरोना विषाणूनंतर आता राज्यात डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, रायगडमध्ये डेंग्युचा फैलाव होतोय. अनलॉक झाल्याने लोकांनी रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि जंकफूड खायला सुरूवात केल्याने याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागलाय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पुण्यात डेंग्यू, टायफॉईड, चिकुनगुनिया, काविळच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. या आजारांमध्ये ताप, अतिसार, उलट्या होणे, डोकेदुखी आणि सांधेदुखीसारखी लक्षणे दिसून येतात. पुण्यात या रुग्णांमध्येही गेल्या दोन आठवड्यांत 7 ते 10 टक्क्यांनी वाढ झालीये. सध्या कोरोना रुग्ण कमी होत असल्याने या रुग्णसंख्येत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे.
Daegu And malaria Risk increased in the state
Latest Videos