मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
डहाणूच्या बविआच्या उमेदवाराने विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला एक दिवस बाकी असतानाच भाजपला पाठिंबा जाहीर केल्याचे पाहायला मिळत आहे. आज दिवसभर डहाणूत महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व घडामोडी घडत असल्याचं बघायला मिळत आहे.
बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांनी भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप केला. यानंतर भाजप आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. नालासोपाऱ्यात सलग 4 तास घडलेल्या घडामोडीनंतर आता डहाणूत मोठा राजकीय भूकंप घडल्याची माहिती समोर आली आहे. डहाणूच्या बविआच्या उमेदवाराने विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला एक दिवस बाकी असतानाच भाजपला पाठिंबा जाहीर केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज दिवसभर डहाणूत महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व घडामोडी घडत असल्याचं बघायला मिळत आहे. डहाणू विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी डहाणू विधानसभेचे भाजप उमेदवार विनोद मेढा यांना जाहीर पाठिंबा दिला असून माघार घेत निवडणुकीच्या एक दिवस आधी भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पुन्हा घरवापसी केली.