Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरळीच्या जांबोरी मैदानात भाजपची 'परिवर्तन दहीहंडी', गोविंदांची सुरक्षा वाऱ्यावर; बघा व्हिडीओ

वरळीच्या जांबोरी मैदानात भाजपची ‘परिवर्तन दहीहंडी’, गोविंदांची सुरक्षा वाऱ्यावर; बघा व्हिडीओ

| Updated on: Aug 27, 2024 | 1:25 PM

BJP parivartan Dahi Handi at worli jambori maidan : भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या या परिवर्तन दहिहंडीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. मात्र भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन दहीहंडीत गोविंदांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईत दहीहंडीला सकाळपासूनच उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणात सुरुवात झाली आहे. मुंबईतील वरळी या भागात भारतीय जनता पक्षाकडून परिवर्तन दहिहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे आयोजकांनी पाठ फिरवल्याचं वास्तव या परिवर्तन दहीहंडीत दिसले. तर वरळीच्या जांबोरी मैदानात वरळी बावन चाळ प्रगती क्रीडा मंडळाने सहा थरांची सलामी देत परिवर्तन दहीहंडी उत्सवाची सुरुवात केली. जल्लोषात सुरू असलेल्या या परिवर्तन दहीहंडीच्या उत्सवात मात्र गोविंदांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने भाजपवर टीका होण्याची शक्यता आहे. यासोबतच कोर्टाने दिलेल्या आदेशात आयोजकांनी सेल्फी बेल्ट पुरवण्याचे बंधनकारक होते. पण भाजपच्या संतोष पांडे यांनी आयोजित केलेल्या परिवर्तन दहीहंडीत गोविंदांसाठी सेफ्टी बेल्टचा अभाव, मैदानात चिखल असताना सुरक्षा मॅटची व्यवस्था नाही, अशाप्रकारे नियोजन असून गोविंदांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे आयोजकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Aug 27, 2024 01:25 PM