ढाक्कुमाकुम ! राज्यभरात दहीहंडीचा मोठा उत्साह, मुंबई अन् ठाण्यात गोविंदांचा जल्लोष

ढाक्कुमाकुम ! राज्यभरात दहीहंडीचा मोठा उत्साह, मुंबई अन् ठाण्यात गोविंदांचा जल्लोष

| Updated on: Sep 07, 2023 | 9:24 AM

VIDEO | मुंबई आणि ठाणे शहरासह राज्यभरात दहीहंडी सणाचा मोठा उत्साह, गोकुळ अष्टमीसाजरी झाल्यानंतर रात्रीपासूनच गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी उतरले रस्त्यावर, कोणतं पथकं लावणार १० थर?

मुंबई, ७ सप्टेंबर २०२३ | गोविंदा आला रे आला च्या जयघोषात आज दिवसभर राज्यभरात गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. दहीहंडी निमित्त अनेक बालगोपाळ तसेच गोविंदा पथक आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळणार आहेत. ठाण्यासह मुंबई येथील दही हंडी उत्सव नेहमीच लक्षवेधी आणि चर्चेचा असतो. त्यामुळे यंदा दहीहंडी पथकांकडून थरांवर थर हे पाहायला मिळणार असले तरी दहा थर कोण लावणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहेत. बृहन्मुंबई महानगरामध्ये गोकुळाष्टमीच्या दिवशी दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.

मुंबई शहर भागासह पूर्व व पश्चिम उपनगरांत हा दिवस ऐतिहासिक ठरावा, यासाठी विविध गोविंदा पथक आणि संबंधित यंत्रणा अथक प्रयत्न करीत असतात. मुंबई महानगरीची एक महत्त्वाची सांस्कृतिक ओळख असणा-या दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात, ही संभाव्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात १०, परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयात ०७ रूग्णशय्या आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात ४ रूग्णशय्या आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच १६ उपनगरीय रूग्णालयातही १०५ रूग्णशय्या सज्ज ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५ ते १० खाटांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.

Published on: Sep 07, 2023 09:24 AM