‘पंतप्रधान मोदी, शाहांच्या मुठीतून सत्तेची वाळू सरकतेय’; सामनातून मोदींवर निशाना
त्याच्याआधी सर्वच पक्ष आता मोर्चेबांधणीला लागले आहेत. तिकडे एनडीए आणि इकडे इंडिया आघाडीच्या बैठकींना जोर आला आहे. याचदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा खासदारकी मिळाल्याने इंडिया आघाडीत जल्लोष संचारला आहे.
मुंबई, 13 ऑगस्ट 2023 | येत्या काही महिन्यातच देशात लोकसभेच्या निवडणुकांची रणधूमाळी होण्याची शक्यता आहे. त्याच्याआधी सर्वच पक्ष आता मोर्चेबांधणीला लागले आहेत. तिकडे एनडीए आणि इकडे इंडिया आघाडीच्या बैठकींना जोर आला आहे. याचदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा खासदारकी मिळाल्याने इंडिया आघाडीत जल्लोष संचारला आहे. दरम्यान अधिवेशनात राहुल गांधी यांनी कमबॅक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. त्यावरून आता ठाकरे गटाचे मुखपत्र दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार आणि घणाघाती टीका करण्यात आली आहे. यावेळी रोखठोक सदरातून मोदी यांच्यावर टीका तर राहुल गांधी यांचे कौतुक करण्यात करण्यात आले आहे. सामनातून मोदी यांच्यावर टीका करताना, पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या मुठीतून सत्तेची वाळू सटकत आहे. 2024 पर्यंत त्यांची मूठ रिकामी झालेली असेल. तर श्री. मोदी यांना 2024 ची निवडणूक सोपी राहिलेली नाही अशी टीका करण्यात आली आहे. तर राहुल गांधी पुन्हा संसदेत पोहोचले व अविश्वास ठरावाच्या चर्चेत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला असे म्हटलं आहे.

नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक

दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी - मोदी

मोदींनी आदमपूर एअरबेसबाबत पाकच्या खोट्या दाव्यांचा बुरखा टराटरा फाडला

शोपियानमध्ये ठार केलेल्या 2 दहशतवाद्यांची ओळख पटली
